If someone calls you a white crow, you can't believe it, can you? A white crow was found in Ratnagiri

कावळा म्हटले की काळा रंग हे गणित ठरलेले आहे. पण पांढरा फटफटीत कावळा असे कुणी म्हटले तर विश्‍वास बसत नाही. पण पांढरा कावळा रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत आढळला. त्यामुळे या पांढऱ्या कावळ्याची एकच चर्चा रंगली आहे. काळबादेवी इथे राहणारे शेखर शेट्ये यांच्या घराजवळ चार दिवसांपूर्वी हा पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला.

  रत्नागिरी : कावळा म्हटले की काळा रंग हे गणित ठरलेले आहे. पण पांढरा फटफटीत कावळा असे कुणी म्हटले तर विश्‍वास बसत नाही. पण पांढरा कावळा रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत आढळला. त्यामुळे या पांढऱ्या कावळ्याची एकच चर्चा रंगली आहे. काळबादेवी इथे राहणारे शेखर शेट्ये यांच्या घराजवळ चार दिवसांपूर्वी हा पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला.

  घराजवळ असलेल्या कोंबड्यांना खाणे घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच वाटला. त्या पांढऱ्या पक्षाची ठेवण, चोच आणि डोळा हा नेहमीच्या कावळ्यासारखाच होता. थोडावेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. तो कावळ्याच. शेखर यांनी पांढऱ्या कावळ्याची गोष्ट शेजारच्यांना सांगितली. सर्वच जण त्याला पहायला आले.

  ठरला चर्चेचा विषय

  काहींनी छायाचित्रे काढून सोशल मीडियावरही शेअर केली. पांढरा कावळा हा दुर्मीळ आहे. त्यामुळे हा कावळा काळबादेवीकरांसाठीच नव्हे तर रत्नागिरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत शेखर शेट्ये म्हणाले की, दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र पांढऱ्या रंगाचा पक्षी इतर कावळ्यांच्या जोडीने खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येत आहे. त्यामुळे तो त्यांच्यातलाच असावा असा अंदाज आम्ही केला.

  शरीरात मेलिनीन द्रव्याची कमतरता

  कावळ्याचा पांढरा रंग हा नैसर्गिक आहे. काळबादेवी येथील तो कावळा ल्युकेस्टिक आहे. काळा रंग येण्यासाठी शरीरात मेलिनीनचे द्रव्य आवश्यक असते. ते कमी असल्यामुळे कावळ्याला पांढरा रंग येतो. काळबादेवीत आढळलेला तो कावळा ल्युकेस्टिक आहे. एका अर्थाने हा पांढरा कावळा नाही तर त्याच्यातील अनुवंशिकतेमुळे तो पांढरा राहिला आहे, असे पक्षी तज्ज्ञ प्रतीक मोरे यांनी सांगितले.