raped in khed

अत्याचार करणारा नराधम हा पिडितेच्या वाडीत राहतो. तसेच तो विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे. अल्पवयीन मुलीचे घरचे कामावर गेले होते आणि आई दवाखान्यात गेले असल्यामुळे ती घरी एकटीच होती.

खेड : खेड ( Khed) तालुक्यातील सोनगावात घरी एकटी असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ( minor girl ) लैगिंक अत्याचार (sexually assaulted) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात त्याच गावातील तरुणाला पोलीसांनी अटक (Arrested) केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, मंगळवारी (१५ सप्टेंबर २०२०) रोजी सकाळी ११ च्या सुमारा ही घटना घडली आहे. अत्याचार करणारा नराधम हा पिडितेच्या वाडीत राहतो. तसेच तो विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे. अल्पवयीन मुलीचे घरचे कामावर गेले होते आणि आई दवाखान्यात गेले असल्यामुळे ती घरी एकटीच होती. मुलगी शेजारच्या घरी गेल्याने आरोपी पि़डितेच्या घरात घुसून लपून बसला. पडित मुलगी घरी आल्यावर त्याने घरातील दरवाजा आतमधून बंद केला. आणि मुलीवर अत्याचार केला. जर कुणाला सांगितले तर ठार करेल अशी धमकी पिडितेला दिली.

अल्पवयीन मुलीचे आई वडील घरी आल्यानंतर मुलीने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आई वडिलांनी नातेवाईकांना घेऊन पोलिस स्थानक गाठले आणि तक्रार नोंद केली. पोलीसांनी आरोपी रोशन खेराडे याला त्याच्या घरातून अटक केली. तसेच तक्रारीनुसार आरोपी खेराडेवर भादवी कलम ३७६, तसच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ( पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.