रत्नागिरी जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५ रूग्ण पॉझिटिव्ह

रत्गागिरी जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत चालले आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसत आहे. जिल्ह्यात आणखी ३५ कोरोना रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मृत व्यक्तींची संख्या ३२ वर गेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ९१२ वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ रूग्णांच्या अहवालामध्ये रत्नागिरी, कामथे, कळंबणी, गुहागर आणि दापोली या भागांत रूग्णांची संख्या वाढली आहे. तसेच एका ७० वर्षीय महिला रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हयात काल एकाच दिवसात ४७ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६६१ इतकी झाली होती. परंतु आज रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढ झाली असून, एकूण संख्या ९१२ वर पोहोचली आहे.