anil parab

राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरी बसवण्यात यशस्वी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील एका-एका मंत्र्याला टार्गेट करण्याची मोहीम भाजपाने उघडली असून त्यात भाजपा नेते किरीट सोमय्या हे आघाडीवर आहेत़ त्यांचे दुसरे लक्ष्य ठरलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  रत्नागिरी : राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरी बसवण्यात यशस्वी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील एका-एका मंत्र्याला टार्गेट करण्याची मोहीम भाजपाने उघडली असून त्यात भाजपा नेते किरीट सोमय्या हे आघाडीवर आहेत़ त्यांचे दुसरे लक्ष्य ठरलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी समिती नेमून परब यांच्या साई रिसोर्ट बांधकाम प्रकरणी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या यांनी साई रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणात लेखी तक्रार दाखल केली होती़ त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीत भेट घेऊन तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात ईडी, सीबीआय, आयकर विभाग, महसूल यांच्याकडेही आपण तक्रार केली आहे. परब यांनी लॉकडाऊनदरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे 10 कोटींचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम आता लवकरच धडकणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा