“नाशिकचा पोलीस आयुक्त हा राष्टपती आहे का? की पंतप्रधान?” राणेंचा सवाल

, “नाशिकचा पोलीस आयुक्त हा राष्टपती आहे का? की पंतप्रधान? मी कुठलंही चुकीचे वक्तव्य केले नाही. पोलिस त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे काम करत आहेत. बघू पाहू कुठपर्यंत उडी मारतात ते आमचंपण सरकार वर आहे." अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

  “मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं हे वक्तव्य आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. रायगडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणेंची जीभ घसरली आणि राज्यात राणे विरुध्द शिवसेना असा संघर्ष सुरु झाला आहे.

  राणेंना अटक करण्यासाठी नाशिक व पुणे पोलिसांची टीम रवाना झाली आहे. याच संदर्भात आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमीका व्यक्त केली आहे.

  यावेळी बोलताना राणे म्हणाले की, “नाशिकचा पोलीस आयुक्त हा राष्टपती आहे का? की पंतप्रधान? मी कुठलंही चुकीचे वक्तव्य केले नाही. पोलिस त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे काम करत आहेत. बघू पाहू कुठपर्यंत उडी मारतात ते आमचंपण सरकार वर आहे.” अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

  “गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मी सामान्य माणूस नाही मी एक केंद्रीय मंत्री आहे. मी काय म्हणालो ते निट बघून घ्या आधी आणि बातम्या द्या. तुमच्या बातम्यांवर मी विश्वास ठेवत नाही. बातम्या देताना त्या व्यवस्थित द्या नाहीतर मी तुमच्या विरोधात याचिका दाखल करेन.” असा दम नारायण राणे यांनी माध्यमांना दिला आहे.

  माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझा तुमच्या माध्यमांवर विश्वास नाही. शिवसेनेने भाजपचे कार्यालय फोडले यात पुरषार्थ नाही. अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

  तर “संविधानीक पदावर असताना मुख्यमंत्र्यांना हे सुध्दा माहिती नाही की देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली. हा तर देशाचा अपमान आहे. उद्या कोणिही उठून देशाबद्दल काहिही बोलेल. राणे योग्य तेच बोलले त्यामुळे आधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी माफी मागावी.” अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.