It was Ratnagiri's mother who drowned her one-month-old baby in a bucket of water; Shocking confession given to the police

जन्मदात्या आईनेच आपल्या एका महिन्याच्या मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. पोलिस तपासात खळबळ कारण समोर आले. चिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या आईने एक महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बालदीत बुडवून मारुन टाकले आहे.

    रत्नागिरी : जन्मदात्या आईनेच आपल्या एका महिन्याच्या मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. पोलिस तपासात खळबळ कारण समोर आले.

    चिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या आईने एक महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बालदीत बुडवून मारुन टाकले आहे.

    या बाळाच्या मृत्यूप्रकरणी सावर्डे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, चौकशी दरम्यान उआईने आपला गुन्हा कबूल केला. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली याच्या रागाच्या भरात घेतला मुलीचा जीव घेतल्याचे या महिलेने पोलिसांना सांगीतले.

    या प्रकरणी निर्दयी मातेवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेने सावर्डेच नाही तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे.