Korana rules for Shimgotsava in Ratnagiri

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण व उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यावरुन मोठ्या संख्येने नागरिक कोकणता येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणं आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

    रत्नागिरी : शिमगोत्सव… कोकणातील चाकरमान्यांच्या जीव्हाळ्याचा विषय. वर्षभर सर्वांनाच शिमगोत्सावाची आतुरता असते. मात्र, यंदाच्या शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. शिमगोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण व उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यावरुन मोठ्या संख्येने नागरिक कोकणता येतात.
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणं आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

    सर्व मंदिर विश्वस्त आणि पालखीधारकांची कोरोना चाचणी बंधनकारक. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेच्या पालखी सजवणे बंधनकारक. ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीला जाणार. पालखी घरोघरी नेण्यास मनाई आहे. पूजा, नवस, पेढे, हार, नारळ स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रसाद वाटपही करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

    पालखी सोहळ्यादरम्यान गर्दी न करण्याचे आवाहन. गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे किंवा इतर भागातून होळीकरता येणाऱ्या नागरिकांचे 72 तासांपूर्वी केलेल्या RTPCR चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.