गुहागर तालुक्यातील कुडली गावात दरड कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही

कोकणातील इतर भागाप्रमाणेच गुहागर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असून मंगळवारी दुपारच्या सुमारास कुडली गावच्या ग्रामपंचायतीमागील दरड कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या याठिकाणी ग्रामस्थांकडून मातीचा ढिकारा हटवण्याचं काम सुरु आहे.

    कोकणात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला, तरी बहुतांशी ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रत्नागिरीला पुन्हा पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

    कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने मंगळवारी दिलेल्या आकवाडीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर ११३, खेड ११४, लांजा ६०, मंडणगड ८९, राजापूर १०६, रत्नागिरी ८३.४, संगमेश्वर ८१ मीलिमीटर इतरा पाऊस पडला आहे.

    एकिकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे दरड कोसळण्याच्या घटनांमुळे परिसरात सध्या भितीचे वातावरण आहे.