road broken

भातगावमधील कदम एसटी स्टाॅप ते वडाची वाडी(Kadam St Stop To Wadachi Wad) या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक(Dangerous Road) बनला आहे.

    गुहागर: गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने रौद्ररूप (Heavy Rain)धारण करून कोकणाला अक्षरशः झोडपून काढले आणि याच अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असुन असाच एक प्रकार गुहागर(Guhagar) तालुक्यातील भातगाव याठिकाणी घडला आहे. भातगावमधील कदम एसटी स्टाॅप ते वडाची वाडी(Kadam St Stop To Wadachi Wad) या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक(Dangerous Road) बनला आहे. रस्त्याला खूप तडे गेल्याने भविष्यामध्ये त्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणे टाळावे असे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी केले आहे.

    भातगावमध्ये कदम एसटी स्टाॅप ते वडाची वाडी रस्त्याला तडे गेल्याने गावात येणारी गुहागर भातगाव एसटी आता कदम स्टाॅपला थांबवली जाते. त्यामुळे या एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कदम स्टाॅपला येऊन एसटी पकडावी, असे स्थानिक सरपंच सुशांत मुंडेकर यांनी सांगितले आहे.

    त्याचप्रमाणे या रस्त्याने वाहतूक करने टाळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटी लावण्यात येणार आहे. भातगाव कदम एसटी स्टाॅप ते वडाची वाडी या रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेबाबत गावचे सरपंच सुशांत मुंडेकर यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांना माहिती दिली असुन रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे भविष्यामध्ये कोणताही अनर्थ होण्याची वाट स्थानिक प्रशासन तसेच स्थानिक आमदार यांनी पाहू नये यासाठी कदम एसटी स्टाॅप ते वडाची वाडी हा रस्ता लवकरच पुर्ववत करावा, अशी मागणी सरपंच सुशांत मुंडेकर तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी केली आहे.

    landslide after heavy rain road broken near bhatgav