रत्नागिरी विभागातील वशिष्ठी नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर , कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी विभागातील चिपळूण (ratnagiri) आणि कामथे स्थानकांदरम्यान १३० किमीवरील वशिष्ठी नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

  रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे (heavy rain) रत्नागिरी विभागातील चिपळूण (ratnagiri) आणि कामथे स्थानकांदरम्यान १३० किमीवरील वशिष्ठी नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

  कोणत्या स्थानकात कोणती रेल्वे किती वाजल्यापासून…

  1) 02617up at SGR from 07:36 hrs
  2) 01134 up at KMAH from 05:17 hrs
  3)01003dn at CHI from 06:14 HRS
  4)04695dnat RN from 07:17 Hrs.
  5) 06346 up at VID from 08:06 Hrs.
  6) 06001 dnat MAO from 08:41 Hrs.
  7) 01151 dn at DwV from 08:50 Hrs.
  8) 06072 up at RAJP from 08:24 Hrs.

  प्रचंड पावसामुळे चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. अनिलजी परब चिपळूणला पोहचले आहेत. पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत अधिकाऱ्यांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला. त्याशिवाय त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली.