रत्नागिरीत आजपासून कडक लॉकडाऊन, दूधही घरपोच मागवावं लागणार, असे असतील नवे नियम

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे आजपासून (२ जून) ८ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रत्नागिरीतील सर्व आस्थापनं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून दूधदेखील घरपोच मागवण्याच्या सूचना देण्याच आल्या आहेत. 

    राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु असून विविध जिल्ह्यांमध्ये तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून त्या जिल्ह्यांना अंशतः दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे तिथले निर्बंध कडक केले जात आहेत.

    रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे आजपासून (२ जून) ८ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रत्नागिरीतील सर्व आस्थापनं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून दूधदेखील घरपोच मागवण्याच्या सूचना देण्याच आल्या आहेत.

    राज्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा धोका आहे. ज्या ठिकाणी आर्द्रता अधिक आहे, त्या भागात म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असतो. त्या पार्श्वभूमीवर सध्या रत्नागिरीतील परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा ८ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

    काय सुरु, काय बंद?

    • दूध आणि किराणा मालाची सेवा सकाळी ७ ते ११ केवळ घरपोच देता येईल
    • मेडिकल पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी
    • इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद राहतील
    • रत्नागिरी जिल्ह्यांत बाहेरून कुणालाही प्रवेश करता येणार नाही
    • रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करण्यासाठी ४८ तासांत केलेली आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असेल
    • मालवाहतूक सुरू राहिल. मालवाहतुकीच्या गाड्या दुकानांपर्यंत माल पोहोचवू शकतील
    • पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतीविषयक दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.