दाभोळ जेटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, दोन जेटया सुरु करण्याची मागणी

चिपळुण मधील पुरस्थिती पुर्वपदावर येत असताना येथील बहाद्दूर शेख पूल तुटल्यामुळे आणि परशुरामघाटही बंद असल्याने चिपळूण येथे दापोली,मंडणगड, खेड तालुक्यातून मदतीकरिता चिपळूण येथे जाण्याकरीता दाभोळ-गुहागर मार्ग चिपळुण एकमेव मार्ग आहे. यामुळे आता या मार्गावर गाड्यांची गर्दी वाढली आहे.

    दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या विक्रमी पावसानंतर मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे. चिपळुण मधील पुरस्थिती पुर्वपदावर येत असताना येथील बहाद्दूर शेख पूल तुटल्यामुळे आणि परशुरामघाटही बंद असल्याने चिपळूण येथे दापोली,मंडणगड, खेड तालुक्यातून मदतीकरिता चिपळूण येथे जाण्याकरीता दाभोळ-गुहागर मार्ग चिपळुण एकमेव मार्ग आहे.

    यामुळे आता या मार्गावर गाड्यांची गर्दी वाढली आहे. यामार्गे जाणेकरीता दाभोळ-धोपावे ही एकमेव जेटी आहे. या जेटीवर आज सकाळ पासून लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्या आहेत. यामुळे मदत नेणाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. या मार्गावर वहातूक वाढल्यामुळे दाभोळ -धोपावे मार्गावर गर्दिच्या वेळी दोन जेटी सुरू करण्याची मागणी आता डाॅ.मोकल यांच्याकडे जनतेतर्फे करण्यात येत आहे.