ratnagiri accident photo

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इको कारला दुसऱ्या कारने मागून जोरदार धडक दिली.अपघाताची(Accident In Ratnagiri) ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता रत्नागिरीत (Ratnagiri) घडली.

    रत्नागिरी : रत्नागिरी(Ratnagiri) शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इको कारला दुसऱ्या कारने मागून जोरदार धडक दिली.अपघाताची(Accident In Ratnagiri) ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. यात कुणालाही दुखापत झाली नसली तरीही दोन्ही गाड्यांचे नुकसान(Loss Of Vehicles In Accident) झाले आहे.

    जाहिद बोरकर (२२, रा. हयात नगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात रवींद्र  झगडे (४२, तेलीवाडी, जयगड ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री रवींद्र झगडे यांनी त्यांची इको गाडी (एमएच-०८-एएन-४३६५ ) प्रादेशिक मनोरुग्नालयाच्या शेजारी रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. त्यात ते झोपी गेले होते. त्याचवेळी जाहिद बोरकर आपल्या ताब्यातील आय ट्वेन्टी गाडी(एमएच -०८- झेड- ५७७२) घेऊन मारुती मंदिरहून एस टी स्टॅन्डच्या दिशेने जात असताना त्याने इको गाडीला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.