रत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; तिघांचा मृत्यू

लोटे एमआयडीसीमध्ये आज सकाळी एका रासायनिक कंपनीत स्‍फोट झाला. या ठिकाणी भीषण आग लागली. यात पाचजण गंभीररीत्‍या जखमी झाले आहेत. आणखी दोन जणांचा अद्याप शोध सुरू आहे. या आगीमुळे महामार्गावर धुराचे काळे लोट दुरवर पसरले. चिपळूण तसेच खेड नगर पतिषदेचे अग्निशामक बंब घटनास्‍थळी दाखल होत आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले.

    रत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी आज (रविवार) सकाळी स्‍फोटाने हादरली. रासायनिक कंपनीत भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, या आगीत पाच जण गंभीररित्‍या जखमी झाल्याचे समोर आले आहे, तर दोन जणांचा अद्याप शोध सुरु आहे.

    लोटे एमआयडीसीमध्ये आज सकाळी एका रासायनिक कंपनीत स्‍फोट झाला. या ठिकाणी भीषण आग लागली. यात पाचजण गंभीररीत्‍या जखमी झाले आहेत. आणखी दोन जणांचा अद्याप शोध सुरू आहे. या आगीमुळे महामार्गावर धुराचे काळे लोट दुरवर पसरले. चिपळूण तसेच खेड नगर पतिषदेचे अग्निशामक बंब घटनास्‍थळी दाखल होत आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले. घटनास्थळी पोलीस तैनात झाले असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, लाेटे एमआयडीसी परिसर पुन्हा एकदा हादरला असून तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर भाजले असल्याची माहिती मिळाली आहे.