रत्नागिरी जिल्ह्यात मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ

रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri district) कोरोना रूग्णांच्या (corona virus) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर (September) महिन्याच्या २९ दिवसात झाला आहे.

 रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri district) कोरोना रूग्णांच्या (corona virus) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर (September) महिन्याच्या २९ दिवसात झाला आहे. आजवर झालेल्या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात झाले आहेत.

कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यानंतर पहिल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण वाढले असले तरी मृतांची संख्या मर्यादीत होती. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढले. या काळात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला.

एकीकडे बाजारात गर्दी वाढली आणि दुसरीकडे घराघरात माणसांची संख्या वाढली. त्यामुळे गणेश चतुर्थीनंतरच्या आठवड्यापासून रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.