मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवा हात समजले जाणारे मिलिंद नार्वेकर अडचणीत; मुरुड येथील बंगल्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पथकाने मंगळवारी दापोली तालुक्यातील मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांच्या मालकीच्या बंगल्याची पाहणी केली. शिवसेनेचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवा हात समजले जाणारे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा बंगलासुद्धा बेकायदेशीररित्या उभा राहत असल्याची तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

    दापोली : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पथकाने मंगळवारी दापोली तालुक्यातील मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांच्या मालकीच्या बंगल्याची पाहणी केली. शिवसेनेचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवा हात समजले जाणारे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा बंगलासुद्धा बेकायदेशीररित्या उभा राहत असल्याची तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

    या संपूर्ण राजकारणामुळे येथील पर्यटन व्यवसायच अडचणीत येण्याची भीती स्थानीक व्यवयासायिक मंडळींना आहे. मोठा रोजगार येथे उपलब्ध होत असताना राजकिय स्वार्थासाठी आमचा बळी का देता? असा खडा सवाल पर्यटन व्यवसायिकानी उपस्थित केला आहे.