MP Vinayak Raut criticizes Raosaheb Danve

भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा 'सांड' असा उल्लेख करणे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे लक्षण आहे. त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हटले, हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

    रत्नागिरी : भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा ‘सांड’ असा उल्लेख करणे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे लक्षण आहे. त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हटले, हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

    खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवरही शेलक्या भाषेत टीका केली आहे. बाडगा जो असतो तो कोडगा असतो. भाजपने शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केले आहे, असे ते म्हणाले.