narayan rane in ratnagiri

आम्हीही सत्तेत येऊ, असे म्हणत पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी. अन्यथा पुढे काय होईल त्याला सामोरे जावं, असा इशारा राणेंनी दिला आहे.नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद(Press Conference) घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

    रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane Criticized Shivsena) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असे म्हणत पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी. अन्यथा पुढे काय होईल त्याला सामोरे जावं, असा इशारा राणेंनी दिला आहे.नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद(Press Conference) घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मी जर गुन्हेगार होतो तर मला मुख्यमंत्री कसं काय केलं ? असा सवाल राणेंनी यावेळी विचारला.

    आम्हीही भविष्यात राज्यात सत्तेत येऊ. केंद्रात सत्तेत आहोत. वरिष्ठांकडून काहीही आदेश आले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे. नाही तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, असं राणेंनी निक्षून सांगितलं आहे. सभेची बंधनं फक्त नारायण राणेंनाच आहे का? आम्हाला मनाई का? कोरोनाची लाट होती तेव्हा कारवाई झाली नाही? आता संपल्यावर कारवाई सुरु आहे. त्यांना विरोध करू दे ही सत्तेची मस्ती आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दरोडे पडत आहेत. खून मारामारी विचारू नका. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असे अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असं ते म्हणाले.

    राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय. नाही तर सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं ? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं ? पहिली पदं तुम्हीच दिली ना तेव्हा विरोध का केला नाही? ३९ वर्षात शिवसेनेसाठी जे काही केलं… साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं ते म्हणाले.