जनआशिर्वाद यात्रेचा पुनश्च हरिओम – नारायण राणेंनी साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले….

नारायण राणे(Narayan Rane) यांनी जन आशिर्वाद यात्रेचा पुनश्च शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला(Janashirwad Yatra Third Stage) रत्नागिरीत(Ratnagiri) सुरुवात झाली आहे.

    मुख्यमंत्र्यांविषयीच्या वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे(Narayan Rane) यांनी जन आशिर्वाद यात्रेचा पुनश्च शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला(Janashirwad Yatra Third Stage) रत्नागिरीत(Ratnagiri) सुरुवात झाली आहे.

    नारायण राणे यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले की, “त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता..असतो तर ना..जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे ? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही.”

    ते पुढे म्हणाले की, “नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटंबियांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे?”

    “आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर ॲसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार.”असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.