नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज(Narayan Rane` Bail Application Rejected) रत्नागिरी न्यायालयाने(Ratnagiri Court) फेटाळला आहे.त्यामुळे आता नारायण राणेंच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

    रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज(Narayan Rane` Bail Application Rejected) रत्नागिरी न्यायालयाने(Ratnagiri Court) फेटाळला आहे.त्यामुळे आता नारायण राणेंच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

    नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचं वृत्त समोर येत आहे.उच्च न्यायालयाने देखील तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.