रत्नागिरी जिल्ह्यात १०२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

  • गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिलह्यात १०२ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ही ४९ वर पोहोचली आहे. त्यामुळे येथील परिसरात चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सर्वाधिक प्रमाणात होत आहे. तसेच गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिलह्यात १०२ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ही ४९ वर पोहोचली आहे. त्यामुळे येथील परिसरात चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १०२ नवीन रूग्णांपैकी ४८ रूग्ण हे चिपळून शहरात आढळून आले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोव्हिड रूग्णालयातील २४ रूग्णांचा समावेश आहे.  राजापूर येथील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे खेडमध्ये देखील २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काल गुरुवारी दिवसभरात ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील कोव्हिड निगा केंद्रामधील १० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.