शिवस्वराज्याभिषेक दिनी ‘अशी’ दिली मानवंदना; १५ फुटी गुढी उभारुन केला दिन साजरा

सुमारे १५ फूट लांबीच्या बांबूवर लाल रंगाचे कापड गुंडाळून, त्यावर शिव ध्वज लावून, पुष्पहार लावण्यात आला. राजदंडच्या टोकाला मंगल कलश उपडा लावून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभी करण्यात आली. लाकडाच्या पाटावर सुरेख रांगोळी काढून हळदकुंकू अर्पण करून, दीपप्रज्वलन करून,जयगड सरपंच सौ. फरजाना अस्लम डांगे यांनी विधिवत या स्वराज्यगुढीची पूजा केली आणि नमन केले.

    रत्नागिरी : ग्रामपंचायत जयगड कार्यालय येथे आज शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. आज प्रथमच संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत जयगडच्या सरपंच सौ. फर्जाना डांगे, उपसरपंच श्री. अमेय कृष्णा पारकर, सदस्य कुमारी प्रमिला झगडे, कुमार विशाल झगडे, ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी, शाखा प्रमुख सर्वश्री ऋषिराज किशोर धूंदुर, नारायण चंद्रकांत काताळकर, शिवसैनिक अविनाश देवरूखकर, पोलीस पाटील श्री. विकास पारकर, ग्रामपंचायत कर्मचारी सौ. सविता नयन खाडे, कुमारी पूनम देवरुखकर, श्री. प्रमोद विठ्ठल झगडे, अंगणवाडी कर्मचारी सौ. वैष्णवी विश्वास पवार, श्रीमती मेस्त्री , श्रीमती पारकर, श्रीमती सोलकर, श्रीमती रत्नप्रभा रहाटे,आदी संबंधित उपस्थित होते.

    दरम्यान सुमारे १५ फूट लांबीच्या बांबूवर लाल रंगाचे कापड गुंडाळून, त्यावर शिव ध्वज लावून, पुष्पहार लावण्यात आला. राजदंडच्या टोकाला मंगल कलश उपडा लावून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभी करण्यात आली. लाकडाच्या पाटावर सुरेख रांगोळी काढून हळदकुंकू अर्पण करून, दीपप्रज्वलन करून,जयगड सरपंच सौ. फरजाना अस्लम डांगे यांनी विधिवत या स्वराज्यगुढीची पूजा केली आणि नमन केले.

    यावेळी उपस्थित सर्व महिला माता भगिनी आणि बांधवांनी यानंतर विधिवत पूजा केली. यानंतर ऋषिराज किशोर धुंदुर यांनी आपल्या खड्या आवाजात शिवगारद दिली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आले तसेच महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशनुसार आज प्रथमच शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.