नारायण राणेंची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी करणे निंदनीय, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी(Rajan Salvi) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात(Ratnagiri Police Station) तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्याशी केली आहे.

    रत्नागिरी : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील झुंज(Battle Between Shivsena And BJP) ऐन श्रावणात रंगत चाचली आहे. सामान्य लोकांचे आशिर्वाद घेण्यासाठी निघालेल्या यात्रेत एकमेकांना शिव्याशाप देण्यात धन्यता मानली जात आहे. त्यात आता कच्चे दावे सुरू झाले असून दोन्ही बाजूंकडून राज्यात विविध ठिकाणी पोलिसांकडे तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत.

    संभाजी महाराजांशी तुलना करणे निंदनीय
    लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी(Rajan Salvi) यांनी देखील अशीच एक तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात(Ratnagiri Police Station) केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्याशी केली आहे. नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे निंदनीय कृत्य आहे.

    जठार यांचे वक्तव्य चिथावणीखोर
    प्रमोद जठार यांनी २४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले असे वक्तव्य केलेले आहे. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे प्रमोद जठार यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी आ. राजन साळवी यांनी या तक्रारीद्वारे केली आहे.