रत्नागिरी | '...तर मी माध्यमांवर गुन्हा दाखल करणार' राणेंचा माध्यमांना इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट26 दिन पहले

‘…तर मी माध्यमांवर गुन्हा दाखल करणार’ राणेंचा माध्यमांना इशारा

ऑटो अपडेट
द्वारा- Navarashtra News Network
द्वारा- Kaustubh Khatu
10:34 AMAug 24, 2021

"गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मी सामान्य माणूस नाही मी एक केंद्रीय मंत्री आहे. मी काय म्हणालो ते निट बघून घ्या आधी आणि बातम्या द्या. तुमच्या बातम्यांवर मी विश्वास ठेवत नाही. बातम्या देताना त्या व्यवस्थित द्या नाहीतर मी तुमच्या विरोधात याचिका दाखल करेन." असा दम नारायण राणे यांनी माध्यमांना दिला आहे.

10:28 AMAug 24, 2021

"नाशिकचा पोलीस आयुक्त हा राष्टपती आहे का? की पंतप्रधान? मी कुठलंही चुकीचे वक्तव्य केले नाही. पोलिस त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे काम करत आहेत. बघू पाहू कुठपर्यंत उडी मारतात ते आमचंपण सरकार वर आहे." अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी  दिली आहे.

10:24 AMAug 24, 2021

माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझा तुमच्या माध्यमांवर विश्वास नाही. शिवसेनेने भाजपचे कार्यालय फोडले यात पुरशार्थ नाही. अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

10:20 AMAug 24, 2021

"संविधानीक पदावर असताना मुख्यमंत्र्यांना हे सुध्दा माहिती नाही की देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली. हा तर देशाचा अपमान आहे. उद्या कोणिही उठून देशाबद्दल काहिही बोलेल. राणे योग्य तेच बोलले त्यामुळे आधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी माफी मागावी." अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

“मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं हे वक्तव्य आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. रायगडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणेंची जीभ घसरली आणि राज्यात राणे विरुध्द शिवसेना असा संघर्ष सुरु झाला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१९ रविवार
रविवार, सप्टेंबर १९, २०२१

येडीयुरप्पा यांनी कर्नाटक यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला पळता भुई थोडी होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.