दरड कोसळल्याने कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

  • गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने वाहतुक रोखण्यात आली आहे. या मार्गावरील काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

कोकण : राज्यात सलग ३ दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांत पाणी साचले आहे. तसेच पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गावरही बसला आहे.  मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळी असल्यामुळे रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने वाहतुक रोखण्यात आली आहे. या मार्गावरील काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 

कोकणा रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-कल्याण मार्गे पुढे काढण्यात आला आहे तर काही पनवेल-पुणे-लोंडा-मडगाव मार्गे अशी वळवण्यात आली आहे. 

तर एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सपेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या दुसऱ्यामार्गे वळविण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे विभागाकडून मिळाली आहे.