स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात; खा विनायक राऊतांचा हल्लाबोल

राणेंच्या यात्रेला लोक येणार नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी ते बोलत आहेत मात्र शिवसेना त्यांना गांभिर्याने घेत नाही. ही यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.

    रत्नागिरी : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार टिका केली आहे. राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना मोजण्याचा त्यांचा गुणधर्मच आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. खा राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत असे ते म्हणाले.

    एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत, असे सांगत स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्मआहे असा टोला राऊत यांनी लगावला.

    राणेंच्या यात्रेला लोक येणार नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी ते बोलत आहेत मात्र शिवसेना त्यांना गांभिर्याने घेत नाही. ही यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा असल्याचे सांगतात. परंतु, पंतप्रधानाच्या आवाहनाला राणेंनी हरताळ फासला.  त्यांनी जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, असा सवालही त्यांनी केला.