rashtrawadi protest at ratnagiri

नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीमुळे पुन्हा रत्नागिरी(Ratnagiri) नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांना निवडून न देण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसकडून करण्यात आले.

    रत्नागिरी:राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस(Rashtrawadi Vidyarthi Congress) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून(Rashtrawadi Yuvak Congress) सोमवारी रत्नागिरीकरांसाठी, ‘खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा’ हे अनोखे आंदोलन(Protest In Different Style) आयोजित करण्यात आले होते. ही स्पर्धा राम नाका ते राधाकृष्ण नाका या दरम्यान घेण्यात आली. दुरावस्था झालेल्या रस्त्याबद्दल एकही शब्द न बोलता, शांतपणे हे सगळं सहन करत आलेल्या नागरिकांना त्यांच्या सहनशीलतेबद्दल गुलाबपुष्प देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

    नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीमुळे पुन्हा रत्नागिरी नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांना निवडून न देण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसकडून करण्यात आले. रत्नागिरीतील नागरिकांना हे अनोखे आंदोलन भावले असून त्यांच्याकडून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
    यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष संकेत कदम, विद्यार्थी शहर अध्यक्ष ॲड.साईजीत शिवलकर, युवक प्रदेश सचिव शबंटी वणजू, युवक जिल्हा उपाध्यक्ष पप्पू तोडणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.