रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची ३७५ मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शिवाय शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासाचा विचार करता ४१ मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ३७५ मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झाला आहे.   

पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या ६५ धरणांपैकी ३४ धरणं १०० टक्के भरली आहेत. सध्या जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील २, दापोलीतील ५, खेड मधील ४, चिपळूणमधील ७, अशी जिल्ह्यातील ३४ धरणं १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे आता जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे. जूनच्या सुरूवातीला पावसानं चांगलीच हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीच्या कामांना देखील सुरूवात झाली आहे.