चिपळूणमध्ये २६ जुलै २००५ची पुनर्रावृत्ती; शहर पूर्णपणे जलमय, मदतकार्याला सुरुवात

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून २००५ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग , कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

  रत्नागिरी – गेले आठ दिवस पडणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरला. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला. या पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला. चिपळूण शहर जलमय झाले. फूणगुस, कसबा, चांदेराई, नावडी, राजापूर शहर, खेड शहराचा काही भाग पाण्यात गेला होता. जगबुडी, बावनदी, मुचकुंदी, सोनवी, शास्त्री, गडनदी या नद्यांच्या धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई- गोवा महामार्ग आणि चिपळूण- कराड मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

  रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून २००५ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग , कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

  दापोली तालुक्यातील मौजे वेळणे येथील प्रदीप कुळये यांच्या घरातील भिंत कोसळल्याने अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. मौजे कांदीवली येथील सुरेश शंकर चव्हाण व मनिषा शिदे यांचे घराचे पावसामुळे अंशन नुकसान जीवीतहानी नाही. खेड शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मदत कार्य सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ येथील अर्जुना नदीची पाणी पातळी वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद झाली होती. खेड-दापोली -खेड-बैरव अतिवृष्टीमुळे वाहतूक मार्ग बंद होता. मौजे खेड येथे मोहल्ला ख्वाजा सौमील व सफामज्जीद चौक गॅस खतीब यांच्या घरात पाणी शिरल्याने व विज पुरवठा खंडीत झाला आहे.

  चिपळूण शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेल आहे. मदत कार्य सुरु आहे. मौजे गोवळकोट वर हीलम अपार्टमेंटला अचानक शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली व अंशतः नुकसान जीवीतहानी नाही. मौजे खेर्डी येथील महावितरणचे ३ कर्मचारी उपविभागीय विदयुत कार्यालयात पाणी शिरल्याने अडकून पडले आहेत. भोर- वरंधा मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मौजे मांडकी येथील दत्तात्रय भास्कर पाध्ये यांच्या घराचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही.

  मौजे पेठमाप येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. मौजे मळेवाडी येथील पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण येथे शंकरवाडी येथे पावसाचे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीतहानी नाही. चिपळूण बाजारपेठ ओतूर गल्ली येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हामी नाही.

  चिपळूण येथे कळंबस्ते मध्ये महिपत कदम यांचे घरात पाणी घुसल्याने घरांचे अंशतः नुकसान झाले. गंगोबा पावर रोड येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. शिवाजी चौक येथे धुडेकर यांचे घरात पाणी शिरल्याने घराचे अंशतः नुकसान झाले. मौजे गोगावे येथे रविंद्र गोविंद शिंदे यांचे दोन बेल वाहून गेले.

  संगमेश्वर तालुक्यातील मौजे निवदे येथील बावनदीवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोजे कासे पुलावर पाणी भरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मौजे बावनदीचे पाणी निवेखुर्द येथे रस्त्यावर आल्याने रस्ता बंद आहे. मौजे धामणी येथील पुराचे पाणी असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवीले आहे, मौजे वांद्री येथे विजेचे पोल रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद पडली.

  रत्नागिरी तालुक्यातील मौजे चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरल्याने बाजारपेठेत अंशतः नुकसान, मौजे निवळी येथील बावनदी वर पाणी पातळी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मौजे सोमेश्वर रत्नागिरी रस्ता वाहतूकीस बंद करण्यात आलेला आहे. रत्नागिरी ते सोमेश्वर – तोणदे -चिंचखरी ला जाणारा मार्ग बंद आहे. मौजे उक्शी येथे अन्वर गोलांजी यांच्या घरात पाणी भरल्याने घराचे अंशतः नुकसान तहसीलदार निवळी येथे शेलतवाडी व निवलकर यांच्या घरात पाणी भरले आहे.

  मौजे हरचेरी येथे पाणी भरल्याने घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे टेंभ्ये बौध्दवाडी येथील श्रीम, आशा प्रदीप पोवार, वय-५४ लस घेण्यास जात असताना वाहून गेल्या.
  लांजा तालुक्यातील मौजे विसावली -बेलेवाडी येथील सुरेश रघुनाथ हातीसकर व जानकू जानू हातीसकर यांचे घरावर आंब्याचे झाड पडून अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. आंजणारी पुलाखालून पाणी वाहत असल्याने वाहतूकीसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. मौजे भांबेड येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेताचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.

  मोजे वाटूळ ते दाभोळ पाणी असल्याने वाहतूक बंद झाली मौजे खोरनिनको येथील २ वाडया जोडणारा लोखंडी साकवाखाली पुराचे पाणी वाहत असल्यायने साकवावरील वाहतूक व ये – जा बंद करण्यात आली आहे. मौजे विलवडे येथील अकबर मलीन यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अंशतः नुकसान झाले आहे. काजरघाटीच्या रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. विलवडे वाकेड पूल पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.

  राजापूर तालुक्यातील मौजे पाचल येथील तळवडे पाणी शिरल्याने अंशतः नूकसान जीवीत हानी नाही. मौजे गणेशवाडी रायपाटण रोडवर पाणी असल्याने वाहतूकीस रस्ता बंद करण्यात आला आहे.राजापूर शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मदत कार्य सुरु आहे.

  हायटाईड व अतिवृष्टीमुळे खेड व चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती आहे. स्थानिक चिपळूण नगरपालिका २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु आहे. रत्नागिरी मधून१, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अश्या ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पुणेहुन NDRF च्या दोन टीम आल्या असून खेडसाठी १ व चिपळूणसाठी १ येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी करत आहेत.