रत्नागिरीच्या ९ विद्यार्थ्यांची पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटमध्ये निवड

सुक्ष्म जीवशास्त्रामध्ये केदार मालये, अमोल जोशी, चिन्मय कुलकर्णी, सुवेल पावरी, अश्विन सावंत, सुधांशू पालांडे तर जैवतंत्रज्ञान शाखेमधील स्वप्निल शिंदे, कृष्णा मोरे व प्रकाश चव्हाण यांचा यामध्ये समावेश आह़े. हे विद्यार्थी उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण विभागात कार्यरत झाले आहेत. या विद्यार्थ्यांची झालेली निवड म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा असल्याचं बोललं जात आहे.

    रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटमध्ये निवड करण्यात आली आह़े. जगभरात विविध लसींच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटमध्ये या विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे.

    लाईफ सेव्हर म्हणून गणल्या गेलेल्या कोवीशिल्ड या परिणामकारक लसीला जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सिरमच्या एच. आर. विभागाकडून रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये कॅंपस मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुक्ष्म जीव शास्त्राचे ६ व जैवतंत्रज्ञान शास्त्राचे ३ अशा एकूण ९ मुलांची निवड करण्यात आली.