Selfie ambushed; Thane couple dies in Ratnagiri

गुहागर : सेल्फीच्या नादात एका जोडप्याने जीव गमावल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरीत घडली आहे. ठाण्यातील हे जोडपं आपल्या कुटुंबियांसह गुहागर तालुक्यातील हेदवी – बामणघळ या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला आले होते. यावेळी ही घटना घडली.

अनंत माणगावकर (३६) आणि सुचेना माणगावकर (३३) अशी दोघांची नावे आहेत. अनंत व सुचेना हे आई, मामेभाऊ यांच्यासमेवत गुहागर येथे फिरण्यासाठी आले होते. शनिवारी याठिकाणी लाटेशी मौज मजा करत असताना या जोडप्याला सेल्फी काढण्याचा मोह झाला.

सेल्फी काढत असताना पत्नीचा तोल गेला आणि ती घळीत पडली. पत्नीला पडताना पाहून पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही तोल गेला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी यांचे मृतदेह बाहेर काढले.