प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे . रत्नागिरी जिल्ह्यात एकट्या चिपळून तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १ हजार २२४ उमेदवारी अर्ज आले आहेत. या अर्जांपैकी छाननीवेळी एकूण ९ अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंच्यात निवडणुकीसाठी एका ७० वर्षांच्या अजीबाईंनीही अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे या आजीबाईनी भल्याभल्यांची बोलती बंद करत बिनविरोध निवडून आल्या आहेत. विजया सुदाम गमरे असे या आजीचे नाव आहे

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे . रत्नागिरी जिल्ह्यात एकट्या चिपळून तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १ हजार २२४ उमेदवारी अर्ज आले आहेत. या अर्जांपैकी छाननीवेळी एकूण ९ अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंच्यात निवडणुकीसाठी एका ७० वर्षांच्या अजीबाईंनीही अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे या आजीबाईनी भल्याभल्यांची बोलती बंद करत बिनविरोध निवडून आल्या आहेत. विजया सुदाम गमरे असे या आजीचे नाव आहे.

चिपळूण तालूक्यातील पलवली ग्रामपंचायतींसाठी एकूण ७ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. जागांपैकी येथून वेळंब येथून केवळ २ अर्ज आले आहेत. त्यापैकी एक अर्ज विजया सुदाम गमरे यांचा असून त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दरम्यान, चिपळून तालूक्यात दाखल झालेल्या १ हजार २२४ उमेदवारी अर्जांपैकी १२१३ अर्ज वैध ठरले आहेत. हे अर्ज ८३ ग्रामपंचायतींसाठी आहेत. ज्या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले त्यात आकले, अनारी, निरबाडे, तोंडली, निवळी, वडेरू (२), आगवे या गावांचा समावेश आहे. तसेच, हे अर्ज छाननीत बाद होण्यामागे दोन पेक्षा अधिक अपत्ये असणे. कागदपत्रातील त्रुटी असणे तसेच इतर काही तांत्रिक कारणे आहेत.