गणेशोत्सवास जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

  • मुंबईतील तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील चाकरमान्यांना गावाकडे येण्यास अटी शर्थी घातल्या होत्या. बाहेरुन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन काळ पाळाणे बंधनकारक ठेवले आहे. परंतु जिल्ह्यात आणि गावांत प्रवेश करण्यासाठीच्या सर्व अटी प्रशासनाने शिथिल केल्या आहेत.

रत्नागिरी – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. तसेच रत्नागिरी, सिंदुधूर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असला तरी मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचा मोह टाळता येत नाही आहे. त्यामुळे अनेक चाकरमानी कोकनाकडे मार्गस्थ झाले आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावाकडे येण्यास बंदी घातली होती. ती बंदी हटवत स्थानिक प्रशासनाने चाकरमान्यांना आपल्या गावच्या सीमा खुल्या केल्या आहेत. चाकरमान्यांना वीना पास परवानगीने येण्यास मुभा दिली आहे.

मुंबईतील तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील चाकरमान्यांना गावाकडे येण्यास अटी शर्थी घातल्या होत्या. बाहेरुन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन काळ पाळाणे बंधनकारक ठेवले आहे. परंतु जिल्ह्यात आणि गावांत प्रवेश करण्यासाठीच्या सर्व अटी प्रशासनाने शिथिल केल्या आहेत. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी आतापासूनच धाव घेतल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईहून कोकणात येण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चाकरमान्यांच्या गाड्यांची रांग लागलेली असून यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. 

कशेडी घाटात होणाऱ्या वाहनांची गर्दी तसेच मुंबई-गोवा महामार्गावर होणारी गर्दी यामुळे जिल्हा प्रशासनाने या घाटातील वाहतुकीचे कडक निर्बध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो चाकरमान्यांना या निर्णयामुळे पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु चाकरमान्यांना क्वारंटाईन काळ पाळणे बंधनकारक असल्याने कित्येक चाकरमान्यांनी आतापासुनच गावाची वाट धरली आहे. यामुळे वाहतुक कोंडी होत आहे.