The beaches in the Konkan are crowded with tourists; After eight months, we got to see the crowd

देशात लॉकडाऊन (lockdown) जाहीर होण्याअगोदरच श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांनी (shrivardhan tourist places) पंधरा मार्चपासून पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र, कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहेत.  आठ महिन्यानंतर गर्दीचे दृश्य पाहायला मिळाले आहे.

श्रीवर्धन : देशात लॉकडाऊन (lockdown) जाहीर होण्याअगोदरच श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांनी (shrivardhan tourist places) पंधरा मार्चपासून पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र, कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहेत.  आठ महिन्यानंतर गर्दीचे दृश्य पाहायला मिळाले आहे.

दोन महिन्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ज्या परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, अशा ठिकाणी सर्व बाजारपेठा, दुकाने खुली करण्यात आली. श्रीवर्धन तालुक्यात केवळ चार रुग्ण  कोरोनावरती उपचार घेत आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पर्यटन व्यावसायिक व पर्यटन व्यवसायाची निगडित असलेले घटकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे संसार शासकीय मदत किंवा काही स्वयंसेवी संस्थांकडून येणार्‍या मदतीवरती चालत होते.

श्रीवर्धन शहरातील पर्यटन व्यावसायिकांनी 4 ऑक्‍टोबरपासून आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, 15 ऑक्टोबर च्या दरम्यान चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांनी बुकिंग केलेली देखील रद्द केली. त्यानंतर पंधरा दिवस या ठिकाणी पर्यटकांनी येण्याचे टाळाले.

दिवाळी सुरु झाल्यापासून पर्यटकांचा ओघ वाढत आहे. श्रीवर्धन शहरातील सर्व हॉटेल रिसॉर्ट जवळ जवळ फुल झाली आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर देखील पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. पर्यटन व्यावसायिकांकडून देखील पर्यटक आल्यानंतर त्यांच्या हातावरती सॅनिटायझर दिले जाते. तसेच आपल्या हॊटेलरूममध्ये देखील पूर्णपणे सॅनिटायझर फवारुन रूम स्वच्छ करण्यात येतात. येणारे पर्यटक देखील आपल्या तोंडाला मास्क लावून सुरक्षेचे उपाय पाळत असल्याचे पाहायला मिळाले.

श्रीवर्धन समुद्रकिनारी घोडा गाडी किंवा घोड्याची सवारी, साईंडबाईक इत्यादी सुरू झाले आहे. मात्र,  वॉटर स्पोर्ट्स सुरू नसल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पर्यटक चांगल्या प्रमाणात येथे आले तर, लॉकडाऊनच्या काळात झालेले नुकसान काही अंशी पर्यटन व्यावसायिकांकडून भरून निघणार आहे. पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने पर्यटन व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत आहे.