कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन असून त्याचा अगोदर कोकणात रिफायनरीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता आता सेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

    रत्नागिरी: कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पाविरोधात (Nanar Project) भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये जवळपास ७० शिवसैनिकांचा समावेश आहे.

    तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते आहेत. प्रवेश केलेले कार्यकर्ते हे सेना आमदार राजन साळवी यांच्या गटातील आहेत. राजापूर तालुक्यात रिफायनरी झाली पाहिजे असे या कार्यकर्ते यांचे मत आहे. पण सेनेची नवीन जागेबाबत भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. त्यामुळे आता हे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सेनेला कोकणात धक्का बसला आहे.

    सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन असून त्याचा अगोदर कोकणात रिफायनरीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता आता सेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.