The joy of swimming in the sea is on the soul; Three tourists drowned on the beach in Dopoli

दोपोलीतील समुद्र किनाऱ्यावर (dapoli beach) तीन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने दापोलीत शोककळा पसरली आहे. समुद्रात पोहण्याचा आनंद या पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे.

रत्नागिरी : दोपोलीतील समुद्र किनाऱ्यावर (dapoli beach) तीन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने दापोलीत शोककळा पसरली आहे. समुद्रात पोहण्याचा आनंद या पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे.

महाड (mahad) येथील आठ तरुण ग्रुप रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील दापोलीच्या पाळंदे समुद्र किनाऱ्यावर (dapoli palande beach)पर्यटनासाठी आले होते. यावेळी हे तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, अचानक समुद्राला भरती आली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा बेपत्ता आहे.

समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या एका हॉटेल मालकाला हे तरुण बुडत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांच्या मदतीने त्याने या तरुणांना वाचवले. सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.