दाऊदच्या प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या मालकाने घेतला मोठा निर्णय; जागेचा वापर होणार ‘या’ कामासाठी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मालमत्तेचे नवे मालक वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी जागेचा उपयोग दहशतवादविरोधी पथकासारखे उपक्रम राबवण्यासाठी करण्यात येण्याचा मानसही बोलून दाखवला.

    रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मालमत्तेचे नवे मालक वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी जागेचा उपयोग दहशतवादविरोधी पथकासारखे उपक्रम राबवण्यासाठी करण्यात येण्याचा मानसही बोलून दाखवला.

    साफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमी अभिलेख विभागाने ही मोजणी सुरु केली. जमिन नावावर करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत.

    यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत. तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे.