१७ ग्रामस्थांसह २४ जनावरे ढिगाऱ्यात ;दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे.

    रत्नागिरी: महाराष्ट्रात सर्वत्रच पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे बाजारपेठा , गावांमध्ये पाणी शिरून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर अनेक ठिकाणे एनडीआरएफ द्वारे बचाव कार्यासही सुरुवात झाली आहे. अशातच रत्नागिरीतील खेड तालुक्यातील पोसरे धामनंद बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने १७ ग्रामस्थांसह २४ जनावरे ढिगाऱ्याखाली गेले आहेत. तर १० जखमी ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत.

    ढिगाऱ्याखाली सापडलेले सर्व ७ कुटुंबातील सदस्य आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे.

    खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे तब्बल १७ जण दरडीखाली असल्याची भीती आहे तर बीरमणी येथे दोन जण अडकले आहेत या ठिकाणी एनडीआरफची टीम पाठवण्यात आली आहे. एनडीआरफची आणखी एक टीम बोलावण्यात आली आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

    बीरमणी येथेच अलीकडे दोन कि.मी.चा रस्ता खचला आहे,  अशी माहीती मिळत आहे. खेड तालुका प्रशासनाने मतदकार्य सुरु केले असुन आपण मदतकार्य करण्याची सूचना देऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जईल प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असल्याचे आमदार योगेश कदम यांनी संगीतले.