महिला उपसरपंचांना वाढदिवस साजरा करणे भोवले, गुन्हा दाखल

  • शिरोली गावातील माजी सरपंचासह ६ सदस्यांनी या उपसरपंचाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे महिला सरपंच चागल्याच गोत्यात आल्या आहेत. गावात कोरोनाचे १० रुग्ण असून भीतीदायक वातावरण असूनही ग्रामपंचायत कार्यालयात वाढदिवस साजरा केला गेला.

शिरोली – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी केली आहे. धार्मिक स्थळे आणि कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु खेड तालुक्यातील शिरोली गावच्या महिला सरपंचाने  ग्रामपंचायत कार्यालयात वाढदिवस साजरा केला. त्यामुळे चांगलेच गोत्यात आले आहेत. याच गावात १० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. असे असतानाही महिला सरपंचांनी सोशल डिस्टंन्सिंगला हरताळ फासून वाढदिवस साजरा केला आहे. जया काळूराम दसगुडे अस या महिला उपसरपंचाचे नाव आहे. 

शिरोली गावातील माजी सरपंचासह ६ सदस्यांनी या उपसरपंचाच्या विरोधात  तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे महिला सरपंच चागल्याच गोत्यात आल्या आहेत. गावात कोरोनाचे १० रुग्ण असून भीतीदायक वातावरण असूनही  ग्रामपंचायत कार्यालयात वाढदिवस साजरा केला गेला. याचे फोटोही सोशल मिडियावर टाकण्यात आले आहेत. या फोटोत काहींनी मास्क घातल्याचे दिसून येत आहे तर काहींनी मास्क न घातल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.