Therefore, the airport should be named after the Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Airport, Nitesh Rane's big statement

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.. म्हणून या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे.

रत्नागिरी : वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Airport) यांचे नाव द्यावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणेंनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. असं नितेश राणे यांनी म्हटले आहे.

चिपीच्या या विमानतळाच्या मंजुरीची प्रक्रिया नारायण राणे पालकमंत्री असताना झाली आहे नारायण राणे या प्रकल्पासाठी आग्रही होती. या प्रकल्पाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नागरी हवाई मंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात झाले होते. हा प्रकल्प केंद्राकडून काही परवानग्या न मिळाल्यामुळे अडकला होता. परंतु आता या प्रकल्पाचे जवळजवळ काम पूर्ण झाले आहे.

येत्या २६ जानेवारीला प्रकल्प सुरु करण्याचा मुहुर्तही मिळाला आहे. या प्रक्रियेत सध्या शिवसेनेचे नेते सक्रिय आहेत. विशेषत: खासदार विनायक राऊत या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहेत. या दरम्यान आमदार राणे यांनी विमानतळाला शिवसेने प्रमुखांचे नाव द्यावे अशी मागणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.