landslide caused damage to home

गेले आठ ते दहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) आज आसूदबाग येथे दरड कोसळून (Landslide In Dapoli) तीन घरांना (Houses Damaged By Landslide)धोका निर्माण झाला आहे.

    दापोलीः रत्नागिरी(Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली(Dapoli) तालुक्यात गेले आठ ते दहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) आज आसूदबाग येथे दरड कोसळून (Landslide In Dapoli) तीन घरांना (Houses Damaged By Landslide)धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार वैशाली पाटील,महसुल विभागाचे मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

    दरम्यान एकूण पन्नास हजार रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आलाय. सुवर्णा सुरेश माने चार माणसे नुकसान २५ हजार,कल्पेश गोविंद माने चार माणसे नुकसान २० हजार, हरिश्चंद्र शंकर माने तीन माणसे नुकसान ५ हजार याप्रमाणे नुकसान आहे. या आसूदबाग येथील गणेशवाडी व येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळून अडीच फुटावर असलेल्या तीन कुटुंबाच्या घरांना भेगा जाऊन धोका निर्माण झाला आहे.

    दरड कोसल्यानंतर तेथील जमिनीला भेगा गेल्या. तसेच अडीच फुटावर कल्पेश माने, संतोष माने, हरिश्चंद्र माने यांच्या तीन घरांच्या जमिनीसह घराच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाल्याने सदर कुटुंबाना स्थलांतर होण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. रेवाळे वाडीतील जि. प.शाळेत येथे स्थलांतरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान या तीन कुटुंबातील ११ माणसांची सध्या शिर्के वाडी येथील नातेवाईकांकडे व्यवस्था करण्यात आली आहे.