कोकणात पावसाचा कहर, रत्नागिरी आणि चिपळूणची परिस्थिती नियंत्रणात, पाहा कशी आहे सद्यस्थिती ?

रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये कोसळधार पावसामुळे काल (गुरूवार) महापूर आला होता. वाहतूक कोंडीसह अनेकांचे हाल-बेहाल झाले. परंतु आज रत्नागिरी आणि चिपळूणची सद्यस्थिती पाहिली असता काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे. 

    रत्नागिरी –  राज्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच महामुंबईसह कोकणाला देखील पावसाने झोडपुन काढले. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये कोसळधार पावसामुळे काल (गुरूवार) महापूर आला होता. वाहतूक कोंडीसह अनेकांचे हाल-बेहाल झाले. परंतु आज रत्नागिरी आणि चिपळूणची सद्यस्थिती पाहिली असता काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे.

    काय सुरू झाले ?

    १)  Reliance , airtel मोबाईल सुरू झाले आहेत

    २) चिपळूणची परिस्थिती नियंत्रणात आहे

    ३) २२ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करणेत येत आहे

    ४) दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत

    ५) वाशिष्टी नदीचे पाणी पात्रात गेले आहे, सखल भागात पाणी आहे तसेच वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग कोसळला असल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद झाला आहे

    ६) पाणी ,जेवण वाटप सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर दोन चाकी व चार चाकी , दुकानांचे व बाजारपेठेतील व्यावसायिकांचे नुकसान झालेले आहे

    ७) आतापर्यंत अंदाजे १२३१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. व
    विद्युत पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे

    ७) धामनंदता खेड येथे दरड कोसळले मुळे ३ व्यक्ती मयत असून अंदाजे १६ ते १७ व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे सदर NDRF ची टीम रवाना झाली आहे.

    ८) हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे आणि नौदल व आर्मीचे जवान मदतीसाठी पोहोचत आहेत.