पालशेत बाजारपेठ पुलावरुन वाहतूक धोकादायक; वेळीच दखल न घेतल्यास अनर्थ होण्याची शक्यता

पावसाळयात सतत पूल पाण्याखाली जात असतो, पिंपर धरण व इतर ठिकाणाहून येणारे पाणी वेगाने येत असते,या पुलावरून वाहतूक,तसेच नागरिकांची वर्दळ सुरू असताना अचानकपणे पाण्याचा लोंढा येत असतो,त्यामुळे बेसावध असणाऱ्या व्यक्ती पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठेतील पुलावरून पावसाळयात दरवर्षी पाणी जात असल्याने चार ते पाच तास वाहतूक बंद असते, सदर पुलाची उंची कमी असून दुतर्फा संरक्षण कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. या पुलावरून शेकडो वाहने, प्रवासी वाहतूक व नागरिकांची सतत ये-जा सुरू असते.

  पावसाळयात सतत पूल पाण्याखाली जात असतो, पिंपर धरण व इतर ठिकाणाहून येणारे पाणी वेगाने येत असते,या पुलावरून वाहतूक,तसेच नागरिकांची वर्दळ सुरू असताना अचानकपणे पाण्याचा लोंढा येत असतो,त्यामुळे बेसावध असणाऱ्या व्यक्ती पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  याच पुलावरून पालशेत हायस्कूल व कॉलेजचे विद्यार्थी जात-येत असतात, शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते, पुलाशेजारी स्थानिक मच्छिमार महिला माश्यांची विक्री करत असतात, त्या परिसरातील पालशेत ही मुख्य बाजारपेठ असल्याने शेकडो ग्राहक येत असतात, पावसाळ्यातील चारही महिने पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर पूल पाण्याखाली जात असतो.त्यामुळे धोका संभवत असतो.

  पूरपरिस्थिती निर्माण झाली निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही मान्य आहे परंतु या मानवनिर्मित पुलावरून शेकडो वाहने, प्रवाशी वाहतूक, नागरिकांची सतत ये-जा चालू असताना, त्यांच्या सुरक्षाहेतू किमान या पुलावर असलेले ‘दुतर्फा संरक्षण कठडे’ तरी दुरुस्ती करा, तसेच या ठिकाणी रेलिंग तरी लावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता मात्र डोळेझाक करून चालणार नाही.पालशेत पुलावर आता उपाययोजना होणे काळाची गरज आहे. अन्यथा महाड सावित्री नदी पुलावर झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

  याबाबत ग्रामपंचायत पालशेत – निवोशी, किंवा संबंधित खाते(सार्वजनिक बांधकाम) किंवा संबंधित लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष घालून सदर पुलाच्या संरक्षण कठड्याची दुरूस्ती आणि देखभाल करावी अशी पालशेत परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे.

  तुम्हाला या बातमीविषयी काय वाटते? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा…

  Traffic from Palshet Market Bridge is dangerous Possibility of disaster if not noticed in time nrvb