घरडा ( Gharda ) केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ३० ते ४० कामगार कंपनीत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथल्या औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोटझाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घरडा ( Gharda ) केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ३० ते ४० कामगार कंपनीत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घरडा ही या औद्योगिक वसाहतीमधली सर्वात मोठी केमिकल कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकामागोमाग २ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना खेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.