Two killed in Goa; Cyclone hits Konkan

कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे चक्रीवादळानेही धडक दिल्यामुळे राज्यावरील संकटात भर पडली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.  गोव्यात आज सकाळी चक्रीवादळाने जोरदार धडक दिली. ज्यात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  मुंबई : कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे चक्रीवादळानेही धडक दिल्यामुळे राज्यावरील संकटात भर पडली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.  गोव्यात आज सकाळी चक्रीवादळाने जोरदार धडक दिली. ज्यात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने आज कोकण किनारपट्टीवर धडक दिली. यानंतर समुद्रातील लाटांनी रौद्ररूप धारण केले होते. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली तसेच फळबागाही जमीनदोस्त झाल्या. झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली. तर मोठ्या प्रमाणात वीजपुरवठाही खंडित झाला. चक्रीवादळाचा फटका राजापूर तालुक्यातील जैतापूर, आंबोळगड, साखरीनाटे, देवरूख या गावांना फटका बसला. जिल्ह्यात साधारणत: दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

  गोव्यात दोन मृत

  गोव्यात आज सकाळी चक्रीवादळाने जोरदार धडक दिली. ज्यात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. राज्यभरात 500 पेक्षा जास्त झाडं पडली असून 100 मोठी आणि तितक्याच लहान घरांचे या वादळात नुकसान झाले तसेच वीजपुरवठाही खंडित झाला. कोकण रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवर जवळजवळ 3 ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नेत्रावती एक्सप्रेस माजोर्डाजवळ रखडली.

  मुंबई, कोकणात पावसाचा अंदाज

  सोमवारी उत्तर कोकणाचा काही भाग, मुंबई, ठाणे, पालघर या भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर या चक्रीवादळाच्या थेट रेषेत येणार नसल्यामुळे शहराला विशेष धोका नसल्याची माहिती हवामान खात्याने मुंबई महापालिकेला दिली आहे.