रत्नागिरीत उदय सामंत यांनी प्रतिष्ठा राखली; शिवसेनेला मोठं यश

रत्नागिरीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिष्ठा राखली आहे. पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांनी बाजी मारली आहे. ११ च्या ११ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. दहा जागांसाठी बिनविरोध निवड झाली . तर, उर्वर्तीत एका जागेवर सुद्धा सेनेच्या उमेदवाराने बाजी मारली.

रत्नागिरी : रत्नागिरीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिष्ठा राखली आहे. पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांनी बाजी मारली आहे. ११ च्या ११ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. दहा जागांसाठी बिनविरोध निवड झाली . तर, उर्वर्तीत एका जागेवर सुद्धा सेनेच्या उमेदवाराने बाजी मारली.

सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे निर्विवाद वर्चस्व पहायला मिळाले. ९ पैकी ९ जागांवर शेखर निकम यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. १७ ग्रामपंचायत उमेदवारांपैकी ८ जागांसाठी बिनविरोध निवडणुक झाली. सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला होती.

गोळप ग्रामपंचायतीमध्येही शिवसेना पुरस्कृत पॅनलने बाजी मारली आहे. गोळप ग्रामपंचायत निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. १५ पैकी १३ जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी उदय सामंत मैदानात उतरले होते.