जलप्रलयानंतर चिपळूणचे शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य, २ कोटी रुपयांचा निधी मंजूर ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

शहरातील अनेक भागात २० फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 

    चिपळूण : शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून २ कोटी रूपयांचा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे .

    गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात २० फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

    यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे ५ अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे देखील  शिंदे यांनी जाहीर केले आहे.