रत्नागिरीतील ‘हे’ गाव कंन्टेंमेट झोन म्हणून जाहीर; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात कडक निर्बंध

राज्यातील ९ जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात कडक निर्बंधांचे संकेत देण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्याने रत्नागिरीतील एक गाव कंन्टेंमेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

    रत्नागिरी : राज्यातील ९ जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात कडक निर्बंधांचे संकेत देण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्याने रत्नागिरीतील एक गाव कंन्टेंमेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

    मागील चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे ६४ रुग्ण आढळले आहेत. खेड तालुक्यातील वरवली गावात आणखी १० रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे वरवली गावातील कोरोना रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने वरवली गाव कंन्टेंमेट झोन जाहीर करण्यात आले आहे.

    कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासानाकडून शोध सुरु आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असून, कोरोना नियमावली संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले आहे.