नारायण राणेंना अटक केल्यानंतर जन आशीर्वाद यात्रेचं काय ? भाजपाचे ‘हे’ नेते पुढे सरसावले

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सध्या मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. तसेच जन आशीर्वाद पुढे घेऊन जाण्यासाठी दरेकर आता पुढे सरसावले आहेत. 

  रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढची जन आशीर्वाद यात्रा ही राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याकरिता प्रविण दरेकर रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.

  विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सध्या मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. तसेच जन आशीर्वाद पुढे घेऊन जाण्यासाठी दरेकर आता पुढे सरसावले आहेत.

  महाराष्ट्रात तालिबानी राजवट नाही, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

  भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत होते. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात बेकायदेशीर पध्दतीने केलेली कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारची दडपशाही असल्याची प्रतिक्रिया विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करणा-या महाविकास आघाडी सरकारने ध्यानात ठेवावे की ही मुघलशाही किंवा तालिबानी राजवट नाही! त्यामुळे महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा प्रयत्न करु नये असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

  शरद पवारांनीही राणे प्रकरणावर केलं भाष्य

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात गदारोळाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना आणि राणे समर्थक आमने-सामने आले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनीही आता राणे प्रकरणावर भाष्य केलं आहे.

  नारायण राणे यांच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राणेंवर उपरोधिक टीका केली आहे. शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे.