२८ टक्के भारतीय जोडपे लग्नाला कंटाळले; आठवड्यातून एकदाच करतात सेक्स!

भारतात लोक आपल्या लग्नापासून कंटाळले आहेत. एका सर्वेक्षणानुसार भारतातील २८ टक्के लोक आपल्या लग्नाला कंटाळले असल्याचे समोर आले आहे.

लग्न म्हणजे जन्मोजन्मीचा गाठी. भारतासारख्या देशात लग्नाला जन्मोजन्मीचे संबंध असल्याचे मानतात. सात जन्म लग्न निभवण्याच्या गोष्टी भारतात होतात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, याच भारतात लोक आपल्या लग्नापासून कंटाळले आहेत. एका सर्वेक्षणानुसार भारतातील २८ टक्के लोक आपल्या लग्नाला कंटाळले असल्याचे समोर आले आहे.

एका इंग्लिश वेबसाइटने केलेल्या या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतातील २८ टक्के जोडपे आपल्या लग्नाविषयी उदासीन झाले आहे. भारतात सेक्स करण्याकडे लोकांचा कल कमी होत असून पूर्वीपेक्षा आता आठवड्यातून फक्त एकदाच शारीरिक संबंध ठेवण्याकडे असल्याचे समोर आले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६.६ टक्के जोडप्यांनी आपल्या लग्नाविषयी असंतुष्टता दर्शविली आहे.

सर्वेक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या अधिकांश लोकांनी हे मान्य केले की लग्नानंतर काही वर्षांपर्यंत त्यांचे आपल्या पार्टनरसोबत संबंध चांगले होते. परंतु कालांतराने ते एकमेकांपासून दूर होऊ लागले. आता ते आपल्या लग्नाला खूपसे कंटाळले आहेत, असेही बऱ्याच जणांनी मान्य केले आहे.